निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला : सुप्रिया सुळे

शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (21:15 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
 
मी आणीबाणी बद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला?”
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती