मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकर्यांना 50 हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे.नियमित कृषी कर्ज फेडणार्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर शेतकर्यांना प्रति युनिट 1 रुपयांची वीज सवलत देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.