Eknath Shinde: मुंबईचं प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन मोडवर

मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (09:45 IST)
सध्या मुंबईत वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईतील रस्त्यांना स्वच्छ करण्याचे काम मुंबई महापालिकेच्या हाती आहे. दररोज रस्त्यांची धुलाई केली जाते. या साठी पाण्याचे टँकर, स्लज डिवॉटरिंग, सूक्ष्मजल फवारणी यंत्र, फायरेक्स टँकरचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथशिंदे हे एक्शनमोड मध्ये आले आहे. त्यांच्या निर्देशानुसार हे काम होत आहे. 
 
वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी महानगरपालिकेने सक्रिय पावले उचलण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. त्यासाठी महानगरपालिका, राज्यातील विविध यंत्रणांनी एकत्ररित्या कार्यवाही करावी. नागरिकांनी प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन लोकचळवळ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा