हिजाबचे जोरदार समर्थन करत हिजाब घालण्याचा विरोध धुडकावून लावणाऱ्या मुस्कान खान मोहम्मद हुसेन खान या विद्यार्थिनीच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी या ठरावाची सूचना आपण स्वतः देणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले. हिजाबच्या समर्थनात मुस्कान हिने जातीयवादी शक्तींना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे तिच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी उर्दू घरास तिचे नाव देण्याचा ठराव मनपा महासभेत केला जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.