शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागितली माफी

शनिवार, 17 जुलै 2021 (08:04 IST)
राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. परंतु सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी निकाल पाहण्याचा प्रयत्न केल्यामुळे वेबसाईटवर लोड झाला अन वेबसाईट क्रॅश झाली होती. निकाल लागल्यापासून ६ ते ७ तास विद्यार्थ्यी निकाल पाहण्याच्या प्रतिक्षेत होते. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना ६ तास झाले तरी निकाल पाहता आला नाही यामुळे त्यांच्यात प्रचंड संताप पसरला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर माफी मागत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.
 
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दहावीचे वर्ष सगळ्यांच्या जीवनातील खुप महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे सगळे जण मोठ्या प्रमाणात निकला पाहण्यासाठी उत्सुक होतात.आज १६ जुलैला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत निकाल लागणार होता.निकाल लागताच सर्वच विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेबसाईटवर निकाल पाहिल्यामुळे वेबसाईटवर लोड झाला आणि तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे सगळ्यांना निकाल पाहता आला नाही. त्याबद्दल सगळ्यांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माफी मागितली आहे.
 
दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट हळू हळू पुर्ववत आणण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. मुलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.निकालाची पुर्व तयारी करण्याची गरज होती परंतु बिघाडाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणारे आहे जेणेकरुन पुढील काळात अशी पुनरावृत्ती होणार नाही.असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती