आरोपींनी 50 हुन अधिक शेल कंपन्यांद्वारे कर्जाच्या रकमेने अनेक मालमत्ता खरेदी केली. त्यातील काही स्वतःच्या नावावर, काही कुटुंबाच्या नावावर तर काही बेनामी आहे. या प्रकरणी ईडीने मुख्य आरोपी विजय आर गुप्ता यांना 26 मार्च 2025 रोजी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.