महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप, अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

रविवार, 2 जुलै 2023 (14:42 IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला असून विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार राजभवनमध्ये दाखल झाले आहेत. सध्याच्या राज्य सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,यांच्या सोबत 30 आमदारांनी देखील सत्तेत सामील होणार आहे. यांच्यासोबत त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस नेतेही उपस्थित आहेत.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा यावेळी राजभवनात उपस्थित असून अजित पवार लवकरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून नऊ नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहे. या मध्ये हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आहे. राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
कोण कोण घेणार शपथ?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवारांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत.
 
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
2. छगन भुजबळ
3. अदिती तटकरे
4. नरहरी झिरवळ
5. दिलीप वळसे पाटील
6. संजय बनसोडे
7. हसन मुश्रीफ
8. अनिल भाईदास पाटील
9. धनंजय मुंडे
 
या प्रसंगी दिलीप मोहिते पाटील, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी तर अजित पवार यांच्या पत्नी उपस्थित आहे.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत होते. पण या बैठकीची कल्पना शरद पवारांना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती