भाजपा जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपातील अंतर्गत वादावर पुन्हा तोफ डागली आहे. भाजपने त्यांच्या सहकारी वर्गाला डावलून ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे कसे लाड सुरु आहेत यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपात इतकी वर्ष सेवा केली त्याचे काय फळ अनेकांना मिळाले असा प्रश्न विचारत खंत व्यक्त केली आहे. भाजपात नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ नेते पक्षामध्ये येत आहेत, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
खडसे म्हणाले की “आमच्या पक्षामध्ये असं झालंय की, ज्यांनी आयुष्य घालवलं पक्षामध्ये, ज्यांनी सत्ता आणली ते बाहेर आणि नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणसं आतमध्ये. मी मुद्दामहून श्याम जाजू साहेबांसमोर सांगतोय.”, भाजपा मध्ये जे अनेक जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सत्तेत सहभागी करून न घेतल्याने अनेक नाराज आहेत. निवडणुकीत हा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.