येत्या 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस महासचिव आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस मुख्यालयात बैठक झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांची या बैठकीला हजेरी होती. 8 नोव्हेंबरला देशात कशा पद्धतीने आंदोलन करायचं, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
त्यामुळे विरोधकांनी हा काळा दिवस साजरा करण्याचं घोषित केलं होतं. त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर देताना ‘काळेधन विरोधी दिन’ हा दिवस साजरा करणार आहे.