‘या’ कारणामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर ‘इतके’ दिवस राहणार बंद

सोमवार, 2 जानेवारी 2023 (07:52 IST)
नाशिक : येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी आठवडाभर बंद राहणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिली आहे…
 
याबाबत देवस्थान ट्रस्टने एक परिपत्रक काढले असून त्यात दिनांक ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना दर्शन देखील घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच सदरचे संवर्धन काम हे भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार असून सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.
 
दरम्यान, नववर्षात मंदिराचे अंतर्गत सौंदर्य टिकवण्यासाठी देवस्थान ट्रस्टने पुरातत्व खात्याच्या सहाय्याने हे पाऊल उचलले असून याठिकाणी आता चांदीचे नवीन दरवाजे बसविण्यात येणार आहे. तसेच या आठवडाभराच्या कालावधीत त्रिकाल पूजा, पुष्प पूजा सुरू राहणार असून यावेळी कोणत्याही भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती