नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्र असलेल्या परिसरात तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत अधिक वाढ होत आहे.पुढील पावसाची स्थिती लक्ष्यात घेऊन आता नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
दारणा धरण समुहातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने दारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने दारणा धरणातून १० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.