मालेगाव: राज्यात महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर

मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी चार ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात  प्रत्येक ड्रोन कॅमेर्‍याने टिपलेली दृश्य ही पोलीस कर्मचार्‍यांना लॅपटॉपवर दिसणार असून गर्दीचा अंदाज येणार आहे़. 
 
या पोलिसांसमवेत स्थानिक रहिवासी असणार असून गर्दीच्या ठिकाणची माहिती तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित ठिकाणी ड्यूटीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वायरलेस तसेच लाऊडस्पीकरवरून दिली जाणार आहे़. या ड्रोनमुळे पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे़ राज्यात महापालिका निवडणुकांसाठी कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दीवरील नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेरे वापरले जाण्याची ही पहिलीच वेळ असून तिचा वापर मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केला जाणार आहे़. विशेष म्हणजे ड्रोनद्वारे आकाशतून अगदी गल्लीबोळापर्यंतची सूक्ष्म माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा