तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ.पायल तडवी यांनी गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे पडसाद संबंध महाराज्यात उमटले आहेत. नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली. याची दखल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती दिली होती. संबंध राज्यात होणारा उद्रेक पाहता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत डॉ. भक्ती हिला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणात अन्य दोन महिला डॉक्टर डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.