मिळालेल्या माहितीनुसार शहरातील व्हीआयपी मुव्हमेंट पाहता पोलिस आणि प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला असतानाच दुसरीकडे रहिवाशी भागात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. अजनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या रामटेकनगर टोळी येथे शुक्रवारी संध्याकाळी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. वैमनस्यातून 5 आरोपींनी मिळून पिता-पुत्राची हत्या केली. या घटनेने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे.