मनसेच्या निशाण्यावर आता डॉमिनोज, लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देणार

गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (16:20 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेआता आपला मोर्चा पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. 
 
डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन डॉमिनोजने मनसेला पत्राद्वारे दिले आहे.
 
अ‍ॅमेझॉन, स्विगी, झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती