डॉक्टरांचा इमानवर उपचार करण्यास नकार

गुरूवार, 27 एप्रिल 2017 (12:22 IST)
जगातील सर्वात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीच्या आरोपांनंतर डॉ. लकडावाला आणि टीमने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता इमानला अबूधाबीला नेलं जाण्याची शक्यता आहे.
 
इमानची बहिण शायमा हिने उपचारानंतर इमानची प्रकृती खालावल्याचे आरोप केले होते. इमानच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याने तिला हालचाल करता येत नसल्याचा आरोप शायमाने केला होता. सोबतच मेडिकल रिपोर्टवर आक्षेपही शायमाने घेतला होता.

वेबदुनिया वर वाचा