ज्यांना स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का ?

सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:56 IST)
पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं केलेल्या आत्महत्येमुळे शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर आता पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 
 
ज्यांना आपलं स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावरही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात सुरू असलेल्या 'खयाल यज्ञ' संगीत महोत्सवालक त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती