पिंपळगांव नजिकच्या अमरधाममध्ये दिवाळी उत्साहात साजरी

सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 (17:16 IST)
अमरधाम विकास समितीकडून शहिदांना आदरांजली 
लासलगाव पिंपळगाव नजीक येथील अमरधाम विकास समितीच्या वतीने यंदाही गांवकऱ्यांसोबत अंत्येष्ट चबुतऱ्याची पूजा करुण मिठाईचे वाटप करत स्मशानभूमीत उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी देशात दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. 
 
यावेळी प्रमुख पाहुणे लासलगांव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, कवी प्रा.शिरीष गंधे, बाळासाहेब जगताप, अमरधाम विकास समितीचे शाम मोरे, सुहास ठाकरे, गोरख वडनेरे, चांगदेव भुजबळ, प्रकाश आंबेकर तसेच सरपंच शांताराम घोड़े,ग्रामस्त सुकदेव भुजबळ, संतोष भुजबळ,गणेश वाघ, रवी घोड़े, सागर आढाव, धनंजय वाकचौरे,सुधीर मोरे,ज्योती मोरे, हीराबाई मोरे, किशोर वाघ, गणेश मोरे, स्वाती मोरे,सुमन वाघ, शुभांगी मोरे, साक्षी मोरे, मुस्कान काजी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
पिंपळगाव नजीक येथील तरुणांनी गेल्या पाच वर्षापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान सुरु करून गावातील अमरधाम येथे झाडे लावून परिसर स्वच्छ केला व महाराष्ट्रातील पहिली अमरधाम विकास समिती स्थापन केली. त्यानंतर प्रा.गंधे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून दिवाळी साजरी करण्यात येत आहे. दिपावली हा हिंदू धर्माचा महत्वाचा आहे त्यात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व आहे हा दिवस अमावस्येचा असतो. वर्षभर होणा-या अमावस्येकडे लोक अशुभ म्हणून पाळतात मात्र, लक्ष्मीपूजनाची अमावस्या शुभ मानली जाते. त्यामुळे लोकांमध्ये असणारी शुभ-अशुभ समज व भीती काढण्यासाठी व अंधश्रध्दा निर्मुलनासाठी याठिकाणी दिवाळी 
साजरी करण्यात येते. यंदाच हे सहावे वर्ष असून यातून देशातील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली असल्याचे शिरीष गंधे यांनी सांगितले आहे. 
 
यावेळी लासलगांव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी या अनोख्या दिवाळीबद्दल अमरधाम विकास समितीच्या सदस्यांचे कौतुक करुण दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पिंपळगांव नजिक हे एक आदर्श गांव आहे. तसेच हा अनोखा कार्यक्रम यापुढेही उत्साहात सामाजिक एकोपा जपत साजरा करावा असे मत व्यक्त केले. 
 
याठिकाणी आकर्षक रांगोळ्या , फुलाची सजावट,शेकडो दिवे, आकाश कंदील लावून विद्युत रोषणाई करण्यात करण्यात आली होती. परिसरातील सर्व लहान मुलांना फटके व मिठाईचे वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून तेथील अंत्येष्ट चबुत-याची पुजा केली. ही अनोखी दिवाळी पंचक्रोशीत नागरिक येथे भेट देत आहे. 

वेबदुनिया वर वाचा