..आणि दिवाकर रावते यांनी राजीनामा काढून दाखवला

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (09:02 IST)
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि मंत्रिमंडळातही स्थायी समिती प्रमाणे पारदर्शकता असावी या दोन मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे चार मंत्री  वर्षा बंगल्यावर गेले. यात एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, विजय शिवतारे, दीपक सावंत, दिपक केसरकर यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या खिशात राजीनामा ठेवला होता. तो राजीनामा त्यांनी पत्रकारासमोर काढून दाखवला. आमच्या पक्षात आदेश चालतो. सूचना, प्रस्ताव चर्चा चालत नाही.राजीनामा हा सर्व मंत्र्यांच्या खिशात असल्याचा दावा रावते यांनी केला. 
 

वेबदुनिया वर वाचा