मदत कशी करायची यावर चर्चा सुरु, लवकरच निर्णय घेणार : मुख्यमंत्री

गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (08:06 IST)
जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मदत कशी करायची यावर चर्चा सुरु आहे. मदत कशी करायची यावर आज-उद्या ठोस निर्णय घेतला जातला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद  दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत दिले.
 
मंत्रिमंडळाची बैठक होईल, पंचनामे होत आले आहेत, लवकरच मदत मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आज दिले. लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, मी दिलासा द्यायला आलोय आधार द्यायला आलोय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा करणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगावमधील पूरग्रस्तांना धीर दिला. काळजी करु नका हे तुमचे सरकार आहे. मदतीचे वचन देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती