धुळे : ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक अडचणीत

सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (09:38 IST)
धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे या ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आंब्याच्या मोहोरावर होत असल्याचे दिसून येत आहे. वातावरण बदलामुळे आंब्याचा मोहोर गळू लागला असून, वातावरण बदलाचा फटका हा आंबा उत्पादक शेतक-यांना बसताना दिसून येत आहे.
 
हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार काही भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आता धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आंब्याचा मोहोर गळून पडत आहे.
 
आंबा उत्पादनात घटीची शक्यता
यंदा आंब्याला चांगल्यापैकी मोहोर आल्यामुळे आंबा उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता आंबा उत्पादक शेतक-यांच्या या आनंदावर ढगाळ वातावरणामुळे विरजण पडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती आता शेतक-यांना वाटू लागली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती