देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओएसडी आणि खाजगी सचिव म्हणून 109 नावांना मान्यता दिली

मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (12:10 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी सचिव किंवा ओएसडी पदासाठी केबिनेट मंत्र्यांनी सुचवलेल्या 125 नावांपैकी 109 नावांना मान्यता दिली आहे. 

प्रशासकीय वर्तुळातील कलंकित अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे ओएसडी किंवा पीए म्हणून नेमू देणार नाही.असे फडणवीसांनी कडक शब्दांत सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून खासगी सचिव आणि ओएसडीची नियुक्ती केली जाते. 
ALSO READ: बुलढाण्यातील लोकांमध्ये पंजाबचा गहू खाल्ल्याने टक्कल पडते, संशोधकाचा मोठा दावा
मध्यस्थांना कोणत्याही मंत्र्यांचे ओएसडी किंवा खासगी सचिव नियुक्त होऊ देणार नाही. मी 125 नावांपैकी 109 नावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित नावे मंजूर केली नाही कारण त्यांच्यावर कोणत्या न कोणत्या प्रकाराचे आरोप आहे. त्यांची काही प्रकरणांत चौकशी देखील सुरु आहे. कोणीही रागावले तरी चालेल पण मी वादग्रस्त नावे मंजूर करणार नाही. 
ALSO READ: नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली
माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की आमचे खासगी सचिव आणि ओएसडीची नियुक्ती मुख्यमंत्री ठरवतात आमच्या हातात काहीच नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटे यांना सल्ल्ला दिला आणि म्हणाले, कोकाटे यांना कदाचित माहिती नाही की मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव नेमण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. कोणीही रागावले तरीही चालेल पण मध्यस्थयांची नियुक्ती केली जाणार नाही. 
ALSO READ: महाराष्ट्रातील वादांच्या लांबलचक यादीवर शरद पवारांचे मोठे विधान
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी असेही म्हटले होते की मंत्री त्यांच्या पसंतीनुसार खासगी सचिव आणि ओएसडीची नावे पाठवू शकतात मात्र ते कोणत्याही परिस्थितीत गैरकृत्यांमध्ये सहभागी नसावी. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती