अंगणवाडी सेविकांचा संप मागे

शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:06 IST)

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंगणवाडी कर्मचा-यांच्या कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी संप पुकारला होता. त्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतल्याची माहिती कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली.

शमीम यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडीच्या बजेटमध्ये 40 कोटी रुपयांची भर टाकली आहे. महत्त्वाचे म्हणजे पोषण आहाराच्या मोबदल्यातही 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सेविकांना किमान 6 हजार 500 रुपये मानधन मिळणार आहे. इतर सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार वाढ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती