ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुणे येथील लोड शेडींग अंशत: मागे

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (16:45 IST)

नागरिकांची होत असेलली ओरड आणि सरकावर निघत असलेल्या रागामुळे आता सरकारने त्वरित पावले उचलली आहेत, यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे भागातील लोडशेडिंग मागे घेण्यात आलं आहे.2100 मेगावॅटचा तुटवडा कायम असल्याने ग्रामीण भागातील भारनियमन कायम राहणार आहे.राज्यात 5 ऑक्टोबरपासून कोळसा उपलब्ध नसल्याने लोड शेडींग सुरु केले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक लोड शेडींग सुरु केले होते. यामुळे नागरिकांच्या कामावर परिणाम झाला होता, तर सरकारवर सोशल मीडियावर सडकून टीका केली आहे. यामध्ये सरकारने लगेच बाहेरून 700 मेगा वॅट वीज विकत घेतल्याची माहिती  दिली आहे. मात्र हे किती दिवस टिकणार आहे हे अजूनही निश्चित असून ग्रामीण भागात आणि जेथे बिल भरणा कमी आहे येथे मात्र लोड शेडींग कायम राहणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती