पाणीपुरवठाच्या 171 प्रकल्पांचे एकाच वेळी ई-भूमिपूजन

मंगळवार, 11 जुलै 2017 (11:46 IST)

राज्याच्या विविध भागात मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, हवामान केंद्र, साठवण टाक्‍या, पाणी शुद्धीकरण संयंत्र, पाणी तपासणी प्रयोगशाळा अशा पाणीपुरवठाविषयक विविध 171 प्रकल्पांचे  व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्षा निवासस्थातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटद्वारे एकाच वेळी ई-भूमिपूजन करुन या कामांचा शुभारंभ केला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्याच्या विविध भागातील पाणी योजनांचे एकाचवेळी भूमिपूजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभिनंदन केले. शुद्ध पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. ग्रामीण भागाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून 1003 नळपुरवठा योजना तसेच 83 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनुरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा