शासकीय महावितरण महानिर्मिती व महापारेषण वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी आणि अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी , कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मंगळवार 4 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. उद्या संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या 4 जानेवारी 2023 दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे. सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती महावितरणाकडून देण्यात आली.