हरिनामाच्या गजरात अलंकापुरीतून माउलींच्या पादुकांचे प्रस्थान

शनिवार, 3 जुलै 2021 (08:35 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत माउलींच्या पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी  मंदिरातील विना मंडपातून प्रस्थान झाले. कोरोनामुळे यावर्षीही प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण असल्याने भाविकांनी आपापल्या घरात राहून प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेतला.
 
अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास बंदी असल्याने यावर्षी श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविक वंचित राहिले. दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वच्छता स्वयंसेवकांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला.
 
कोरोनामुळे यंदा पायी वारी होणार नाही. त्यामुळे 3 जुलै ते 19 जुलै संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरीच मुक्कामी राहणार आहेत. 19 जुलैला सकाळी 10 वाजता पादुका पंढरपूरकडे एसटी बसने जाणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती