मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या करीता लोकसभेत श्रीरंग बारणे यांची मागणी

बुधवार, 6 एप्रिल 2022 (17:11 IST)
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे केंद्र सरकार कडे मागणी करत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सभागृहाचे लक्ष पुन्हा एकदा वेधले. ते म्हणाले, मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मराठी ही महाराष्ट्र, गोव्याची अधिकृत भाषा आहे. अनेक वर्षांपासूनचे मराठी भाषांचे शिलालेख, ताम्रलेख, कोनशिला, पुरातन वस्तू, साहित्य पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे.भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ',जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !, धर्म पंत जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी! बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी!!.

मराठी ही हजार वर्षांची परंपरा असलेली भाषा आहे. असे असतानाही आज पर्यंत केंद्र सरकार ने जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्याचे लोकसभेत सांगितले. या वेळी त्यांनी मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी लोकसभेत केली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती