लता दीदींचे निधन, दुखवटा म्हणून राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (16:26 IST)
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
लतादीदींचं पार्थिव 12.15 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान ब्रिच कँडी रुग्णालयातून 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं.
लता दीदींना सैन्य दल, नौसेना, वायुसेने दलातील शिष्टाचार विभागीतील अधिकारी मानवंदना देत आहेत.
संध्याकाळी6:30 वाजण्याच्या दरम्यान दादर येथील शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार केले जातील.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशात लता दीदींच्या निधनामुळे दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. देशातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहे.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येतील.