मागील वर्षी जून महिन्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली गेली होती परंतू प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे गोंधळ उडाला होता. तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. निश्चित आकडेवारीही उपलब्ध नव्हती आणि या सगळ्यांमुळे सरकारला टीकेलाही सामोरे जावे लागले होते. ऑनलाइन अर्ज करणे ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी सोपे नव्हते.