औरंगाबादच्या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या दरोडा

गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (13:50 IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची बातमी आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दरोडेखोर रक्कम घेऊन पसार झाले.
 
सकाळी पेट्रोल पंपावर पैशांची मोजणी सुरु असताना ही घटना घडली. तोंड बांधून दोन अज्ञात दरोडेखोर पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी  दरोडा टाकला. 
 
माहितीनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम मोजत असताना तोंड बांधून आलेले दोन अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला.
 
या घटनेमुळे परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती