अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (10:47 IST)
भारतीय हवामानविभागाच्यवतीनं देण्यात आलेल्याइशार्‍यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी आजही पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीनं चार दिवसांचे हवामानाचे इशारे जारी केले होते. विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती, तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.त्याप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड जिलह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. 
 
 जिल्ह्यात दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिके भुईसपाट झाली आहेत. बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. उध्वस्त झालेली पिके बघून बळीराजा रडकुंडीस आला असताना कृषी विभाग मात्र दोन दिवसापासून सुरु असलेला अवकाळी पाऊस शेतपिकांना उपयुक्त असल्याचे म्हणत आहे. अवकाळीच्या नुकसानीवर सरकार फुंकर मारेल अशी आशा बळीराजाला होती. मात्र कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्याने बळीराजाची आशाही वाहून गेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती