कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे हत्येचा तपास एनआयएतर्फे नाही

शनिवार, 24 मार्च 2018 (11:38 IST)
ज्येष्ठ विचारंवत ए. ए. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) तपास होऊ शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले.
 
कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. उमादेवी यांनी कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे यांच्या हत्येची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याची मागणी केली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी अशा प्रकारच्या हत्यांचा तपास एनआयएच्यावतीने करण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासोर ही सुनावणी झाली.
 
यावेळी न्यायालयात सरकारच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरला. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयसह महाराष्ट्र आणि कर्नाटकसरकारला एक जुलैपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विचारवंत नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे आणि कलबुर्गी हत्यांमागे सामायिक मोड्‌स ऑपरेंडी वापरण्यात आल्याचा युक्तिवाद उादेवी यांनी न्यायालयात केला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना हत्येचा उलगडा करण्यास आप यश न आल्याने उमादेवी यांनी एनआयएच्यावतीने तपास करण्याची मागणी केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती