डी एस कुलकर्णी यांच्या अडचणी वाढल्या , कोर्टाने दिला एक तास

शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (09:06 IST)
बांधकाम कंपनी डी.एस.के. अर्थात  डी एस कुलकर्णी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोर्टाने त्यांना फटकारले असून नुसत्या मालमत्ता का दाखवता ? ज्यांचे पैसे मिळतील त्या लगेच दाखवा लगेच अर्थात एक तासात दाखवा असा आदेश दिला आहे.  बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंना दिला आहे. संपत्तींची यादी हायकोर्टात सादर कऱण्यात आली. यानंतर हायकोर्टाने डीएसकेंना फटकारलं आहे. त्यामुळे कुलकर्णी सुटण्या ऐवजी अजून अडकले आहेत. हायकोर्टाला तुम्ही काय बाजार समजतात का ? तीन सुनावणीत मुदत मागून तुम्ही केवळ  वेळ वाढवून घेतली आणि ही यादी दाखवत तुम्ही  न्यायालयाची दिशाभूल केली आहे असे कोर्टाने नमूद केले आहे.इतक्या वर्षात कमावलेला रोख नफा थकीत रकमेच्या २५% म्हणून तातडीनं जमा करा, असं हायकोर्टाने सुनावल आहे. राज ठाकरे यांनी कुलकर्णी यांची बाजू घेतली होती मात्र राज्यातून कोणीही पैसे बुडवे कुलकर्णी यांना सदभावना दाखवली नाही .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती