परप्रांतीय मुद्दा राज विरुद्ध नाना आणि मुख्यमंत्री

गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (15:03 IST)
परप्रांतीय मुद्दा पुन्हा एकदा गाजत असून आता राज  यांच्या   विरोधात  आता नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीय लोकांची पाठराखण  केली  आहे . त्यामुळे आता मनसे विरोधात  नाना आणि मुख्यमंत्री असा वाद पहायला मिळत आहे.
काय म्हणाला नाना पाटेकर :
हे नुकसान गरिबांचे झाले आहे. मनसेचे फक्त एक वोट गेले मात्र अनेकाचा रोजगार गेला,  ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे. मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यांना भाकरी कमवायचा अधिकार आहे,
 
मुख्यमंत्री देवेद्ब्र फडणवीस :
उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणा-या लोकांनी  महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतीयांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले,  त्यांनी मुंबईला मोठे बनवले आहे.भाषा वादाचा विषय असू शकत नाही. भाषा संपर्काचं माध्यम असून भाषा माणसाला जोडते. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद निर्माण करु नये असे वक्तव्य आता मुख्यमंत्री यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
 
राज ठाकरे यांचे उत्तर 
मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही त्यामुळे जेथून आले तेथे परत आज हा   एकाच मार्ग आहे असे मात्र मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.  मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळं ते येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसं बनवू शकतात, असे देसाई यांनी  प्रश्न उपस्थित केले आहे. 
 
या सर्व प्रकारामुळे आता काही काळ तरी परप्रांतीय मुद्दा तरी गाजणार आहे हे उघड झाले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती