कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आले असून चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत आहे. किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक भागाला तडाखा बसणार आहे. याचा प्रकोप कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना देखील जाणवणार आहे.
रायगड जिल्ह्यातील १३५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक १९१६, नंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागता येईल