ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गोळीबारात मरण पावले. व यांचे पार्थिव बोरिवलीतील त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पार्थिव साधारण दुपारी दोनच्या सुमारास घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांचे वडील धाय मोकलून रडले व त्यांची पत्नी व मुलीने एकच टाहो फोडला. थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर बोरिवलीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. ते मुंबईतील दहिसर इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र होते.
उद्धव ठाकरे यांनी उपस्थिति दिली-
उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी पोहोचले. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची अशी धक्कादायक हत्या झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा घोसाळकरांच्या घरी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच उद्धव ठाकरे व ठाकरे गटाचे सर्व नेते हे घोसाळकरांच्या निवास्थानी समोर असलेल्या एका हॉलमध्ये उपस्थित होते.