भोगावती नदी पात्रात पिरळ येथे मगरीचे दर्शन

सोमवार, 1 मे 2023 (09:16 IST)
राधानगरी तालुक्यातील पिरळ येथे नदीकाठावर मोटार पंप दुरुस्ती करणाऱ्या मिस्त्रीला व शेतमजूर यांना मगरीचे दर्शन झाले, पहिल्यांदाच भोगावती नदी पात्रात मगर दिसल्याने या परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे
 
आज सकाळी अकराच्या दरम्यान प्रगतशील शेतकरी सागर निल्ले यांच्या मळ्याच्या जवळ भोगावती नदीचे पात्र आहे, याठिकाणी नदी जवळ मोटार पंप दुरुस्ती करण्यासाठी विलास चौगले व प्रकाश कांबळे हे दोघेजण मोटार दुरुस्ती करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांना नदीकाठावर अंदाजे पाच ते सहा फूट मगरीचे प्रत्येक्ष दर्शन झाले, याची वनविभागाला माहिती दिली, घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले, सध्या नदी पात्रात कमी झाल्याने मगर इतरत्र गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला,उद्या सकाळी पुन्हा या मगरीचा शोध घेतला जाईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले
 
दरम्यान भोगावती नदीकाठावरील ग्रामस्थांना कपडे,जनावरे,पोहण्यासाठी नदीवर जाण्यास स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने मज्जाव करण्यात आला आहे , या मगरीच्या संदर्भात माहिती मिळाल्यास वनविभागाची हेल्पलाईन 1920 या क्रमांकाशी संपर्क साधला असे आवाहन वनक्षेत्रपाल साईनाथ तायनाक यांनी केले आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती