उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज शिवारात प्रियकर हिरालाल बाबूराव गायकवाड (वय 75, रा. लिमयेवाडी) यांचा खून केल्याच आरोपातून त्याची प्रेयसी नीलावती कुंडलिक माळी (वय 65, रा. हिरज) हिची निर्दोष मक्कता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी. के. अनभुले यांनी दिला.
हिरालाल गायकवाड यांच्या हिरज येथील शेतात आरोपी नीलावती ही कामास होती. त्यांचत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिने हिरालाल यांचकडे घर बांधणे व खर्चासाठी पैसे मागितले होते. त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे आरोपी नीलावती हिने हिरालाल याचा खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. वैधकीय पुराव्यावरून असे दिसते की, हिरालाल यांच्या शरीरावर दोन प्रकारच्या हत्याराने मारलेल अनेक जखमा आहेत. त्यावरुन दोन हल्लेखोरांनी वेगवेगळ हत्याराने हिरालालवर हल्ला केला आहे. वयस्कर स्त्री एवढ्या जखमा करणे शक्य नाही. केवळ संशयावरून आरोपीस गुंतविण्यात आले आहे. असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.