गणपती बाप्पा पावले, सापडले चोर

बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:18 IST)
मुंबईत गणेशोत्सव वेळेत अनेक चोरांनी आपली चांदी केली होती. यामध्ये मुख्यतः प्रवासी मार्ग असेल्या  दादर ते चिंचपोकळी स्थानकातील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरी झालेल्या 20 मोबाइल जप्त केले असून, हे यश दादर रेल्वे पोलिसांना  आले आहे. पहिल्या फेरीत पकडलेल्या मोबाइलची एकूण किंमत 4 लाख 75 हजार रुपये आहे. हे माहिती सेंट्रल परिमंडळाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे. यामध्ये पोलिसांनी  20 मोबाइलपैकी 7 मोबाइल मालकांची ओळख पटवण्यात आली आहे. उर्वरित 13 मोबाइल मालकांची ओळख  अजून तरी पटलेली नाही. मात्र नागरिकांचे मोबाइल चोरी झालेले आहे त्यांनी दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले .
 
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे  लोहमार्ग पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. मुंबई येथील चिंचपोकळी रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढत असताना ज्ञानेश्वर जगताप यांच्या खिशातील 17 हजाराचा मोबाईल काढून पलायन करणाऱ्या दिल्लीतील हरीषकुमार अमरसिंग या चोराला लोहमार्ग पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मध्ये मुंबईला जे गालबोट लागेल ते दूर करता येणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती