जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ४ पॅरा या स्पेशल फोर्सचे जिगरबाज वीर लान्स नाईक संदीप सिंग हुतात्मा झाले. पाकिस्तानच्या हद्दीतून भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन घुसखोरांवर संदीप यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. त्यानंतरच आपला देह धारातीर्थी ठेवला. संदीप सिंग यांच्यामागे पत्नी, ५ वर्षांचा मुलगा आहे. संदीप सिंग कार्यरत असलेल्या ४ पॅरानेच २०१६ साली पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते.