औरंगाबाद : १०० पेशा जास्त अवैध गर्भपात

शनिवार, 27 मे 2017 (17:28 IST)

नाशिक येथे अवैध गर्भपात प्रकरण ताजे आहे. आता औरंगाबाद येथे सुद्धा अवैध गर्भपात प्रकरण उघड झाले आहे. यामध्ये सुमारे १०० अवैध गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे निवृत्त सरकारी डॉक्टर ने हा प्रताप केला आहे.  गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड औरंगाबाद  महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. . डॉ गायकवाडांना मदत करणारी त्यांची साथिदारही औरंगाबाद महापालिकेत सेविका म्हणून काम करते आहे.पोलिसांनी सर्व प्रकरणाची तपासणी सुरु केली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये आरोपी पकडला जातो मात्र जे गर्भपात करयाला सासरचे भाग पडतात त्याच्यावर कारवाई करायला हवी अशी नागरिक मागणी करंत आहे. कारण गर्भपात जरी डॉक्टर करतो तरीही स्त्री गर्भपात हे घरातील नातेवाईक करवतात.

वेबदुनिया वर वाचा