पुन्हा पत्रकारावर हल्ला

शुक्रवार, 31 मार्च 2017 (22:33 IST)
डीएनए या वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर नवी मुंबईतील खारघर परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली आहे. मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताचे हाड या मारहाणीत मोडले आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये असलेल्या  बिल्डींगजवळ सुधीर सूर्यवंशी यांना ही मारहाण झाली आहे. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सूर्यवंशी यांनी जबर मारहाण केली. त्याचे ऑपरेशन होणार आहे. पोलिस आयुक्तांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार सुरक्षा विषय समोर आला आहे.

वेबदुनिया वर वाचा