ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारची चिंता वाढली होती. परंतु आरोग्य विभागाच्या उपाययोजनेमुळे परिस्थिती आटोक्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये या साठी राज्य शासनाने कोरोना निर्बंध लावले होते. आता कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यसरकार आता निर्बंध कमी करण्याचा विचार करत आहे. जरी काही जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी रुग्णसंख्येत कमी होईल. सध्या राज्य सरकार कोरोनाचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा विचार करत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च पर्यंत कमी होऊ शकते. तज्ञांच्यामते कोरोनाची लाट मार्च पर्यंत ओसरण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.