कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आदेशात बदल करण्यात यते असून बदलत असलेल्या मोसमाप्रमाणे लागणारे साहित्य जसे रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट्स तसंच या संबंधित व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी आवश्यक साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु राहतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या गरजेप्रमाणे बांधकाम व्यवसायाशी संबंधित दुकाने व व्यवसाय अत्यावश्यक सेवेत देण्यात आलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु ठेवू शकतात, असे देखील सांगण्यात येत आहे.