'अनिल देशमुख आणि राजेंद्र शिंगणे यांना विदर्भाची जबाबदारी'
बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की (पक्षाच्या) नेत्यांना विविध विभागांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. विदर्भाची जबाबदारी अनिल देशमुख आणि राजेंद्र शिंगणे यांना देण्यात आली आहे, तर मराठवाड्याची जबाबदारी राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगावकर यांना देण्यात आली आहे.