महाराष्ट्रात येणार थंडीची लाट, या भागात अलर्ट जारी

मंगळवार, 31 जानेवारी 2023 (13:07 IST)
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका वाढत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी वातावरणात बदल झाले आहे. ढगाळ वातावरणात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. काही ठिकाणी बर्फ पडत आहे त्यामुळे हवामान गारठलेले आहे.

त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात होणार असून उद्या पासून राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात काल  सकाळी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट, नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली होती. वाहनांना हेडलाईट लावून चालवावे लागत होते. तापमानात चढ उतार होत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात देखील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.पुण्यासह, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अलर्ट जारी केला आहे. गुजरातहून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ठाणे, उत्तर मुंबई आणि पालघर येथे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यात 26 जानेवारी पर्यंत थंडीचा जोर कमी होईल असा अंदाज बांधण्यात आला होता मात्र राज्यात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती