सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील बंद असलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरु, दररोज ६०० सिलेंडरची निर्मिती

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (15:35 IST)
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील बंद असलेला  स्वस्तिक एअर प्रॉडक्ट या ऑक्सिजन निर्मिती करणारया प्रकल्प ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते कार्यान्वीत करण्यात आला. यावेळी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, कोविड संसर्ग झाल्यामुळे ऑक्सिजन अभावी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचा जीव वाचवणे ही शासनाची प्राथमिकता असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन मागणीचा ताण कमी होऊन दिलासा मिळेल .
 
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे स्वस्तिक एअर प्रॉडक्ट  ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प प्रलंबित वीज देयके व इतर कारणामुळे बऱ्याच कालावधीपासून बंद होता. कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत असून रुग्णाला ऑक्सिजनचा तुटवडा राज्यासह जिल्ह्यात जाणवत असून काळाची गरज ओळखून आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ऊर्जा राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांचेकडे सदर प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
 
ना. तनपुरे यांनी गांभीर्य ओळखून कार्यवाहीचे निर्देश दिले. या कंपनीचा बंद असलेला  वीज पुरवठा कमी प्रकिया पूर्ण करून  तात्काळ सुरु करण्यात  येऊन निर्मितीला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून दररोज ७ किलोचे जम्बो सिलेंडर असलेले ६०० सिलेंडर एव्हढी ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे जवळपास  साडेपाच टन पर्यंत निर्मिती होणार असून यामुळे  जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती