याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर पठार भागातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह गावातील एका मुलासोबत होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर चाईल्ड लाईनने ही बाब घारगाव पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविली.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख आणि चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी बालविवाह होत असलेल्या गावात गेले.तेथे त्यांनी अल्पवयीन मुलीचे पालक आणि उपस्थित सर्वांना कायद्याची माहिती देत बालविवाह करणे हा अपराध असल्याचे सांगितले. त्यानंतर बालविवाह रोखला.