माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ही एकच असून दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नाही, अशी टीका केली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हणत टोला लगावला होता. यावर आता शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, "काही लोकं सर्वोच्च न्यायालयालाच मार्गदर्शन करत असतील, तर त्यावर आम्ही काय बोलायचे?" असे म्हणत टोला लगावला.
शिवसेना ही एकच आहे, आणि एकच राहणार; काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यामंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आमदारांचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून आमचा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. काही लोकं सर्वोच्च न्यायालयालाच मार्गदर्शन करत असतील, तर त्यावर आम्ही काय बोलू शकतो?" असे म्हणत टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत, "उद्धव ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद कायद्याच्या दृष्टीकोनातून दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारी होती." अशी टीका केली.